Samudrapur-Wardha Kotwal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, तुमचे शिक्षण कमीत कमी 4थी, 7वी, 10वी किंवा 12वी पास असेल तर कोतवाल पद मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय सेलू – वर्धा (Office of Tehsildar and Taluka Magistrate Selu – Wardha) अंतर्गत तहसीलदार यांच्या द्वारे कोतवाल रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय समुद्रपूर – वर्धा अंतर्गत “कोतवाल” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 09 मे 2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेपर्यन्त कार्यालयीन वेळेत तहसीलदार, समुद्रपुर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
भरती प्रकार : सरकारी
भरती कालावधी : पर्मनंट (Permanent)
पदाचे नाव – कोतवाल
पदसंख्या – एकूण 14 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोतवाल | 4 थी पास |
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 20/-
परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसीलदार, समुद्रपुर यांच्या कार्यालयात तलाठी आस्थापना शाखा, अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वतः हजर राहून सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये.
● अर्ज मिळण्याचे ठिकाण : अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा
● अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
● जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे:
उमेदवाराने स्थानिक जागेचा रहिवाशी असल्याबाबतचे (घर टॅक्स पावती /रेशनकार्ड/निवडणूक ओळखपत्र / मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड / पॅन कार्ड / आधार कार्ड) यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय जाहीरनाम्याच्या दिनांकाला कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्ष या दरम्यान असावे. (पुराव्या दाखल जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / पॅन कार्ड /ड्रायव्हींग लायसन्स, यापैकी एखादा पुरावा जोडणे आवश्यक आहे.)
उमेदवार शारिरिक दृष्ट्या सक्षम असावा, नियुक्ती नंतर जिल्हा मेडिकल बोर्डाचे / चिकीत्सक प्रमाणपत्र 1 (एक) महिन्यात उमेदवाराला सादर करावे लागेल.
📑समुद्रपुर- वर्धा कोतवाल भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करावे.
How To Apply For Samudrapur-Wardha Kotwal Notification 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 (सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत )आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gyHLU |
✅ अधिकृत वेबसाईट | wardha.gov.in |
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत प्रक्रियेद्वारे होणार आहे.
पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी जिल्हास्तरावर घेण्यांत येईल. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाचे पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
सदर परिक्षेला आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेटर, मोबाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
लेखी परिक्षा देणाऱ्या पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक 25 मे 2023 रोजी जिल्हास्तरावर घेण्यांत येईल.
उमेदवारांची निवड लेखी परिक्षा व मुलाखत यांच्यात मिळालेले एकुण गुण लक्षात घेवून गुणानुक्रमे करण्यांत येईल.
मुलाखतीच्या वेळेस मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.