Sheli Palan Yojana 2022 | अहिल्यादेवी शेळी,मेंढी पालन अनुदान योजना | नवी योजना शासन निर्णय PDF पहा.

Goat farming Scheme of Government of Maharashtra | To accelerate goat rearing business through community development in the state under this scheme. To create new entrepreneurs related to goat rearing. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास योजना 2022

Sheli palan yojana 2022

राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास योजना ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक जारी करून मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये समूह विकासातून शेळीपालन (Goat farming )करणे, त्यास अनुदान देणे, शेळीपालनातून तसेच त्यातील विविध उपघटकातून मिळणाऱ्या उत्पादनातून, व्यवसायिकांना/ शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाकडून या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
तर जवळपास 37 क्षेत्रांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागातील व्यवसायिकांना/ शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे. तर काय आहे ही योजना? याबद्दल ची संपूर्ण माहिती आणि विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो ही नवी योजना आहे ; खाली सविस्तर माहिती वाचा व या योजनेचा लाभ घ्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास योजना 2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या ६ प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना (Goat Cluster scheme) राबविण्यास मान्यता देण्याबाबत. पंचायत समिती शेळी पालन योजना 2022

महाराष्ट्र शासन :- कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास शासन

Sheli Palan Yojana 2022 in marathi | अहिल्यादेवी शेळी,मेंढी पालन अनुदान योजना | नवी योजना शासन निर्णय PDF पहा.

Goat Cluster scheme प्रस्तावना :

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळीपालनास महत्वाचे स्थान आहे. राज्यातील शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरलेला आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक तथा भूमिहिन ग्रामीण लोकांच्या उपजीवीकेचे शेळी पालन व्यवसाय महत्वपूर्ण साधन आहे. शेळ्यापासून मांस, कातडी व लेडीखताचे उत्पादन मिळते. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार देशातील शेळयांची संख्या १४.८८ कोटी असून महाराष्ट्र राज्यातील शेळयांची संख्या १०६ लक्ष एवढी आहे. महाराष्ट्र राज्य देशामध्ये सहाव्या क्रमांकावर असून देशामधील शेळयांच्या संख्येत ७.१२% एवढे योगदान आहे.

इथे पहा :- बी-बियाणे अनुदान योजना 2022 | बियाण्यास 50% अनुदान | Maha DBT Biyane Anudan Yojana अर्ज सुरू..

राज्यामध्ये शेळी पालन व्यवसाय हा शेतमजूर, अल्प, अत्यल्प भूधारक, भटकती करणारा समाज तसेच आदिवासी यांच्या उपजिवीकेचा एक प्रमुख व्यवसाय असून राज्यामध्ये अंदाजे ४८ लाख कुटुंबांना शेळी पालनामधून अर्थार्जन होत आहे. हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षणप्रवण, दुष्काळी व निमदुष्काळी भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो. कोरडे हवामान शेळ्यांना पोषक असून दुष्काळी भागामध्ये जेथे अन्य कोणतीही पशुधन पाळण्यास मर्यादा येतात, तेथे शेळी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेळी पालन व्यवसाय हे एक उत्पन्नाचे साधन आहे. अत्यंत कमी चान्यवर व कठीण परिस्थितीतसुध्दा शेळ्या तग धरु शकतात. वातावरणीय बदलाशी त्वरीत जुळवून घेण्याची त्यांची क्षमता असते. अत्यंत कमी भांडवलात सुध्दा शेळी पालन व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार तरुण याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहत आहेत.

अहिल्यादेवी शेळी,मेंढी पालन अनुदान योजना | नवी योजना शासन निर्णय PDF पहा.

येथे क्लिक करा

Sheli palan yojana 2022 योजनेचा उद्देश :

1 )राज्यामध्ये समूह विकासामधून शेळीपालन व्यवसायास गती देणे.


2) शेळी पालन संबंधित नवीन उद्योजक निर्माण करणे.


3) शेळी पालकांचे उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था स्थापन करून त्या माध्यमातून त्यांना शेळी पालन प्रशिक्षण, शेळी पालन व्यवसायाकरिता लागणाऱ्या सुविधा पुरविणे, जसे तांत्रिक माहिती अद्याचवत तंत्रज्ञान, आरोग्यसुविधा अनुवंशिक सुधारणा तसेच शेळ्यांकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जेणेकरून शेळी पालकांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे.


4) शेळी पालकांना त्यांच्याकडे उत्पादन होणाऱ्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे.


5) शेळीपालकांना फॉरवर्ड लिकेजेस निर्माण करून देणे, जसे शेळ्यांच्या वजनावर विक्रीची व्यवस्था, दूध प्रक्रिया उद्योग निर्माण करणे, माल साठवणुकीकरिता शीतगृह, खाद्य कारखाने, निर्यात सुविधा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, कौशल्य विकास करणे, कृत्रिम रेतन, Breeding Improvernent लसीकरण इत्यादीची व्यवस्था करणे.


6) शेळी पालनकरिता लागणाऱ्या वस्तू, साहित्य उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करणे. ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार निर्मिती करणे.. शेळयांच्या पैदास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.

Sheli-Palan-Yojana-Application-form-PDF-Download अर्ज डाउनलोड करा 

Sheli palan sarkari anudan yojana 2022 ठिकाण / कार्यक्षेत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास योजना 2022 सविस्तर माहिती खाली वाचा.

शेळी पालन अनुदान योजना 2022 योजनेचे स्वरूप

(अ) शेळी पालकांना व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रोत्साहित करणे, उत्पादक कंपन्या स्थापन करणे (Backward Linkages) या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्यामधील किमान ३०००० शेतकऱ्यांना / पशुपालकांना या व्यवसायाबाबत प्रोत्साहित करण्यात येईल. त्यासाठी या भागामध्ये सर्वेक्षण करून या व्यवसायामध्ये इच्छूक असणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येईल. त्यांना शेळीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शेळी उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था यांच्या माध्यमातून शेळी समूह निर्माण करण्यात येईल. या समुहाच्या माध्यमातून शेळीपालकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी शेळ्या खरेदी करण्याकरीता मदत करण्यात येईल.

इथे पहा :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Falbag Lagwad Yojana 2022 | 100% शेतकरी अनुदान योजना  ऑनलाईन अर्ज सुरु

शेळी मेंढी पालन योजने अंतर्गत समाविष्ट बाबी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा अमरावती यांच्या ताब्यात असलेली व पशुसंवर्धन विभागाच्या नांवे असलेल्या ९.५ एकर क्षेत्रावर प्रामुख्याने खालील सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे:

(१) सामूहिक सुविधा केंद्र (Common Facility Center) स्थापन करणे :

सदर प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायासंबंधीत विषयाचे सखोल ज्ञान व्हावे, याकरिता State-of-the-art ही संकल्पना विचारात घेऊन शेळी समुह प्रकल्पांतर्गत २ एकर क्षेत्रावर सामुहिक सुविधा केंद्र उभारण्यात यावे. त्यामध्ये प्रशिक्षण केंद्र (प्रशिक्षण वर्ग, विद्याशाखा खोली, बहुउद्देशिय हॉल), १०० प्रशिक्षणार्थी करिता निवासस्थान, कर्मचारी निवासस्थान, इलेक्ट्रिसिटी, पाणी पुरवठा सुविधा, फर्निचर व इतर अनुषंगिक सुविधांची उभारणी करणे इ. बाबींचा समावेश असेल.

(२) शेळयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्र स्थापन करणे सदर प्रकल्पांतर्गत सुमारे २.५ एकर क्षेत्रावर शेळ्यांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे २ युनिटस स्थापन करण्यात यावेत. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस/संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात यावी. ज्या व्यक्ती/संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती/संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.

(३) शेळयांचे मांस प्रक्रिया केंद्र स्थापन करणे सदर प्रकल्पांतर्गत सुमारे १.५ एकर क्षेत्रावर मांस प्रक्रिया केंद्र (१ युनिट) स्थापन करण्यात यावे. याकरिता लागणाऱ्या इतर सर्व सुविधा जसे, बांधकामे, यंत्रसामुग्री इ. उभारणी प्रक्षेत्रावरील जमीन खाजगी व्यक्तीस / संस्थेस भाडेकरारावर विहित प्रक्रियेचा अवलंब करुन देण्यात यावी. ज्या व्यक्ती/ संस्थेस भाडेकरारावर जमीन देण्यात येईल, ती व्यक्ती/संस्था सदर केंद्राची उभारणी करेल.

(४) शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांकरिता कार्यालय सदर प्रकल्पांतर्गत सुमारे ०.५ एकर क्षेत्रावर शेळी उत्पादक कंपनी व खाजगी व्यावसायिकांसाठी कार्यालय उभारण्यात यावे. सदर कार्यालय शेळी उत्पादक कंपनी किंवा खाजगी व्यवसायीकांना भाडे करारावर देण्यात यावे.

sheli palan anudan योजना 2022 कागदपत्रे 

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  •  सातबारा (अनिवार्य)
  • ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

शेळी मेंढी पालन योजना 2022 अर्ज कुठे करावा लागेल

शेतकरी बंधूंनो या योजनेचा शासन निर्णय तुम्ही नक्कीच वाचला असेल असे मला वाटते , अधिकृत वेबसाइट http://mahamesh.co.in/ ही आहे तरी ही योजना तुमच्या जिल्हयासाठी सध्या चालू झाली आहे हे माहिती करून अचूक अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या किंवाच तालुक्याच्या कृषि अधिकारी साहेबांकडे या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी लागेल व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अर्ज करावा लागेल.

अधिक माहितीसाठी ;- •सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२२०४१९१२५६४४९००१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे..

Leave a Comment


Scroll to Top