जमीन मोजणीसाठी सरकारी अर्ज कसा करायचा? | जमिनीतील वाद कायमचे मिटवा ; या मागणीसाठी किती पैसे भरावे लागते! वाचा सविस्तर माहिती..,

शेती : जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? | जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? या मागणीसाठी किती पैसे भरावे लागते! वाचा सविस्तर | शेत जमीन मोजणी अर्ज online and offline process

अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.

शेतकऱ्यांची जमीन किती आहे हे त्याच्या सातबाऱ्यावर दिसत असते.मात्र सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये अनेक वेळा तफावत होते मग अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हाच एक चांगला पर्याय असतो. अनेक वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात. या मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारले जाते, त्याचबरोबर शेत जमीन मोजणी अर्ज कसा करतात तो अर्ज कोठून डाउनलोड करावा, त्याची प्रिंट कशी काढावी आणि तो अर्ज कोणाकडे सादर करावा हि संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत.

हे देखील नक्की वाचा :- शेती : तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? असा पहा मोबाईलवर 5 मिनिटांत नकाशा..,

शेत जमीन मोजणी अर्ज / शेताचा बांध.

शेतीमध्ये सर्वात जास्त भांडण होण्याचे जे कारण आहे ते म्हणजे शेताचा बांध होय, शेताच्या बांधामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात वाद होण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीची मोजणी होऊन आपापल्या शेतातील बांध निश्चित निश्चित केल्यास शेतातील वाद कमी होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी शेत जमीन मोजणी अर्ज विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

shet mojani arj in Marathi शेत जमीन मोजणी अर्ज

jamin mojani arj
/- > सरकारी मोजणी – खाली अर्ज डाउनलोड करा.

shet mojani arj in Marathi जमीन मोजणी अर्ज नमुना मराठी

मित्रानो हा अर्ज मराठी मध्ये आहे. त्यामुळे आपल्यला हा अर्ज भरण्यासाठी काही अडचण तर येणार नाही मला अशी अशा आहे. तरीपण आपल्यला हा अर्ज भरण्यासाठी काही अडचण ये असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. त्या अडचणीचे निवारण करण्याचा नक्की प्रयन्त करू. मित्रानो हे लक्षात ठेवा आपल्या जो काही शेताची मोजणी करायची आहे. त्या ७/१२ वरील जमीन धारक यांच्या सही व नाव या अर्ज वर लिहावे लागेल. व त्या शेताची मोजणी करायची आहे त्या लागत ज्यांचे शेत असेल त्यांचे नाव व पत्ता या अर्जावर लिहा. मित्रानो आपण ७/१२ हा ऑनलाइन कडू शकता या साईट वर जाऊन /-  digitalsatbara mahabhumi खाली अर्ज आहे .>

तर मित्रानो आपण या अर्जाची प्रिंट कडून तो पूर्ण पणे भरून हा अर्ज उप भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन मध्ये जाऊन हा अर्ज दाखल करून जी काही मोजणी फीस असेल ती भरावी व त्यांच्या कडून मोजणी फी ची पावती घ्यावी. त्यानंतर ते आपल्यला एक तारीख देईल त्या तारखेला येऊन ती मोजणी करतील.

हे देखील वाचा :- घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा Online मिळणार फ्री मध्ये | आपल्या घरच्या जागेचा मालमत्ता पत्रक / उतारा 5 मिनिटांत पहा मोबाईलवर..,

तुमच्या शेतीचे श्रेत्र जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मोजणी अर्ज हा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दाखल करावा लागतो. हद्द कायमसाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३६ अशी कायदेशीर तरतूद केलेली आहे. मोजणीचा अर्ज सादर केल्यानंतर मोजणी अर्जाला मोजणी रजिस्टर नंबर हा दिला जातो.

जमीन मोजणीसाठी अर्ज : मोजणी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी :-> इथे क्लिक करा

जमीन मोजणी अर्ज करण्याची सोपी पद्धत :– तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.

त्यानंतर पहिल्या पर्याय पुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे चे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते.

त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो यातील मोजणीच्या प्रकार समोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो. त्या पुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेत जमीन ज्या गट क्रमांकात येतो गट क्रमांक आवश्यक असतो.

तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेल्या मोजणी फी ची रक्कम याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागतो. त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावे. मोजणीसाठी जी फी आकारली जाते तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायचे आहे किंवा ती किती कालावधीमध्ये करून घ्यायचे आहे यावरून ठरत असते.

तर मित्रानो आपल्यला अर्ज सोबत कोणते कागदपत्र लागतात त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहेत.

  • पहिला म्हणजे अर्ज
  • मोजणी करण्यासाठी फीस भरलेली चलन किंवा पावती
  • ३ महिन्याची मिळकत पत्रिका
  • ३ महिन्याच्या आतील ७/१२
  • आधार कार्ड

जमीन मोजणीचे साधारण तीन प्रकार पडतात :

साधी मोजणी: जी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते.

तातडीची मोजणी : तीन महिन्यात पर्यत करावी लागते.

अति तातडीची मोजणी: दोन महिन्याच्या आत केली जाते.

असे आहेत दर:

एक हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये आणि तातडीच्या मोजणीसाठी दोन तर अति तातडीची मोजणी साठी तीन हजार रुपये आकारले जाते. त्यामूळे किती कालावधीत तुम्हाला मत मोजणी करून घ्यावी आवश्यक आहे. त्यानुसार कालावधी कॉलम मध्ये लिहू शकता.

उद्देश: या पर्याय समोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहावा लागतो. जसे की शेत जमिनीचा वाद जाणून घ्यायचा आहे, कोणी बांधावर अतिक्रमण केला आहे काय? याप्रमाणे आपला जो उद्देश असेल ते आपण देऊ शकतो.

जमिनीच्या सहधारकांची माहिती:

चौथ्या पर्यायामध्ये “सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक” म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असल्यास त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.

पाचव्या पर्यायामध्ये “लगतचे शेतकरी यांची नावे आणि पत्ता” लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहणं गरजेचं आहे.

अर्जासोबतच्या कागदपत्रांचं वर्णन:

शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात. जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते. ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

कागदपत्रांची तपासणी:

हा अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.

मोजणी अर्जाची पोहोच:

मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. व शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते. धन्यवाद!

ह्या योजना वाचल्या का तुम्ही :- LPG GAS SUBSIDY 2022 : घरगुती सिलेंडरवर पुन्हा 200 रु. सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का? असं तपासा; नसेल मिळत तर अशी करा तक्रार…,

Jan Samarth Loan Portal |जन समर्थ पोर्टलवर नागरिकांना मिळणार सरकारी कर्ज |शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 12 सुविधा , अशी करा तुमची नोंदणी…,

ग्रामपंचायत विभाग योजनांची यादी 2022 | Maharashtra Gram Panchayat Yojana List | पहा कोणत्या विभागांतर्गत कोणकोणत्या योजना..,

Voter ID-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय नाही केल्यास…

सूचना- नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

Disclaimer: We Do Not Collect Any Information From The Visitors Of This Website. Articles Published Here Are Only For Information And Guidance And Not For Any Commercial Purpose. We Have Tried Our Level Best To Keep Maximum Accuracy, However Please Confirm From Relevant Sources For Maximum Accuracy. Trade Mark And Copy Rights Are Of Respective Owners Of Website.


Scroll to Top