Silai Machine anudan Yojana Maharashtra 2022 : योजनेचा समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज 2022 महाराष्ट्र राज्य

नमस्कार शेतकरी मित्रांनो , सरकार आपल्यासाठी नवनवीन योजना काढतच असते. त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारने योजनेचा समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य महिलांसाठी राबविण्याच ठरवलं आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेची सविस्तर पणे माहिती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यस्तरावर अनेक योजना राबिवल्या जात आहेत.
शिलाई मशीन योजना 2022
? पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज 2022 : मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे रुपये 7,300/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीनसाठी Silai Machine Yojana आपल्याला 100 टक्के अनुदान मिळेल. तसेच जिल्हा परिषदेच्या 50 पेक्षा जास्त योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
हे वाचले का तुम्ही:- LPG GAS SUBSIDY 2022 : घरगुती सिलेंडरवर पुन्हा 200 रु. सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का ? असं तपासा; नसेल मिळत तर अशी करा तक्रार…,

शिलाई मशीन योजना पात्रता काय आहे
- लाभार्थी पुण्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी.
- बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून कमी असावे.
- आधार कार्ड असावे.
- लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती /भटक्या जमाती संवर्गातील असावा. “Silai Machine Yojana Maharashtra”
कागदपत्रे
- आधार कार्ड पुढची बाजु
- आधार कार्ड मागची बाजु
- तलाठी उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- बँक पासबुक व इतर

हे वाचले का तुम्ही:- शेती : तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? असा पहा मोबाईलवर 5 मिनिटांत नकाशा..,
मोफत शिलाई मशीन योजना फायदे
शिलाई मशीन योजना महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शिलाई मशीन योजनेअंतर्गत,100 टक्के अनुदान महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते.
ग्रामीण भागातील महिला घरबसल्या शिवणकाम करून, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती /भटक्या जमाती संवर्गातील व गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

इतर लाभासाठी अपात्र असल्याचे कारणे काय आहेत.
आपण ग्रामसेवकांना प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे असे दिसून येत आहे की, खालील आवश्यक बाबींची आपल्याकडून पूर्तता न झाल्याने आपण सदर ‘Silai Machine Yojana Maharashtra’ योजनेच्या लाभांसाठी पात्र ठरू शकला नाही.
आपण अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात मोडत नाही.
1. आपण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी नाही.
2. आपण अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात मोडत नाही.
3. आपण अजूनही वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाही.
4. आपले बँक खाते आपण अजूनही आधार लिंक केलेले नाही.
5. आपले वार्षिक उत्पन्न हे १ लाखांपेक्षा जास्त आहे.

महत्वाचे वाचा :- ग्रामपंचायत विभाग योजनांची यादी 2022 | Maharashtra Gram Panchayat Yojana List | पहा कोणत्या विभागांतर्गत कोणकोणत्या योजना..,
अर्ज करण्यासाठी लिंक – https://punezp.mkcl.org/zpLabharthi/scheme/eligibleSchemesView खाली संगीतल्याप्रमाणे करा अर्ज..,
असा करा शिलाई मशीन साठी ऑनलाइन अर्ज
Silai Machine anudan Yojana Maharashtra 2022 – योजनेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत शिलाई मशीन योजना 2022 यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला , समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल , खाली सविस्तर वाचा.
- प्रथम >> https://punezp.mkcl.org/zpLabharthi/scheme/eligibleSchemesView येथे क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जावे. सर्वात आधी आपल्याला येथे ज्यांच्या नावाने फॉर्म भरावयाचा आहे त्यांची नोंदणी करावी लागेल. अशी करा नोंदणी
वरील निळ्या रंगाच्या Link वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे वेबसाइट पेज दिसेल.

2) यानंतर तुमचा मोबाइल नंबर व आधार क्रमांक प्रविष्ट करावा तसेच बरोबर च्या चिन्हावर क्लिक करून पुढे जा वर क्लिक करावे.
3) त्यानंतर तुमच्या समोर खाली दिल्याप्रमाणे आणखी एक पेज ओपेन होईल.

या पेज मध्ये तुम्हाला विचारलेली माहिती अचूक भरा.
4) त्यानंतर पुढे जा या बाटनावर क्लिक करा , मोबाइल वर एक 4 अंकी OTP येईल, तो तेथे टाका.
आत्ता तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल , यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज दिसेल , आत्ता आपल्याला शिलाई मशीन योजना 2022 यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत शिलाई मशीन योजना 2022 यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील Video मध्ये संगीतल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप / क्रमा- क्रमाने ऑनलाइन अर्ज करावा. .. .>> खालील video संपूर्ण पहा व अर्ज करा. ??????
खालील योजना नक्कीच वाचा व सरकारी योजनांचा लाभ घ्या :- Personal Toilets Scheme 2022 | वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु ; 12000 रु. अनुदान असा करा अर्ज स्टेप बाय स्टेप..,