Sinchan yojana 2022|ठिबक सिंचन व तुषार सिंचन 55% अनुदान योजना; महाराष्ट्रभर अर्ज सुरू झाले

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळ्यासाठी अनुदान देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’ या योजनेला 2021 मध्ये पूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुदानास पूरक म्हणून अनुदान दिलं जातं.

ठिबक सिंचन कृषी सिंचन योजना 2022

शेतकऱ्यांनो , ठिबक व तुषार  सिंचनासाठी  हेक्टरी मिळवा 1,27,000 रु. अनुदान | नवीन GR आला, आजच ऑनलाईन अर्ज करा

शेतकरी बंधुंनो सध्या कृषी विभागाच्या Maha dbt पोर्टल वर ठिबक सिंचन, आणि तुषार सिंचन या सिंचन सांधनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जात प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात

Sinchan yojana 2022 ठिबक सिंचन कृषी सिंचन योजना 2022
Sinchan yojana 2022

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान दिलं जातं तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिलं जातं. आणि या योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून वरील 30% आणि 25% अनुदान हे या योजनेअंतर्गत दिलं जातं.

याच पार्श्वभूमीवर या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यापैकी 60% निधीच्या प्रमाणात प्रमाणामध्ये 360 कोटी रुपयांचा निधीसह ही योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. आणि यापैकी 165 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर काय आहे शासन निर्णय ? कशाप्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ? हे आपण जाणून घेउया…

शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना आणली आहे यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे, सिंचन पंप, तुषार सिंचार, ठिबक सिंचन अशा कृषी सिंचन घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. 

शासन निर्णय पाहण्यासाठी :->> येथे क्लिक करा

Sinchan yojana 2022

1) बाब :- (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6

खर्च मर्यादा :- 127501 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 1,2001 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 95,626 रुपये

2) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5

खर्च मर्यादा :- 97,245 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 77,796 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 72,934 रुपये

3) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 5X5

खर्च मर्यादा :- 39,378 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 31,502 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 29,533 रुपये

1) बाब : तुषार सिंचन (1 हेक्टर साठी)

खर्च मर्यादा (75mm) :- 24,194 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 19,355
अनुदान :- 75 % नुसार – 18,145

Sinchan yojana 2022

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन अर्ज कसा करायचा ?

कृषी विभाग महाराष्ट्र राज्य : – ही योजना सध्या चालू आहे लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या .

Mhadbt poratl yojana 2022

या योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने एक आफिशिअल पोर्टल तयार केलं आहे

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच mhadbt वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

3)‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण नंतर दुसऱ्या नंबरला ‘सिंचन साधने व सुविधा’ हा ऑप्शन दिसेल. त्याच्यासमोरच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक घटक (सूक्ष्म सिंचन घटक) समोरील बाबी निवड वर क्लिक करा.

Sinchan yojana 2022 |शेतकऱ्यांनो , ठिबक व तुषार  सिंचनासाठी  हेक्टरी मिळवा 1,27,000 रु. अनुदान
टीप :- ऑनलाइन अर्ज सादर करताना ठिबक व तुषार सिंचनासाठी हा पर्याय निवडावा.

4) यानंतर तुम्हाला सिंचन ‘सिंचन स्रोत’ हा ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचं शेतावरील ‘सिंचन स्रोत’ / ‘ऊर्जा स्रोत’ / तसेच तुमच्याकडे कोणतं सिंचन उपकरण आहे, त्यावर सिलेक्ट करा.यानंतर खाली ‘जोडा’ या शब्दावर क्लिक करा. तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या जतन होईल..

5) आता तुम्हाला तुमचं स्रोत ऍड झालेलं दिसेल. आता तुम्ही मुख्यपृष्ठ वर या. आणि पुन्हा ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक करा. आणि पुन्हा ‘सिंचन साधने व सुविधा’ वरील बाबी निवडा वर क्लिक करा.

6) आता तुमच्यासमोर मेन अर्ज खुलेल जसे की, गाव / तालुका / गट क्रमांक / मुख्य घटक / घटक निवडा / परिणाम / काल्पर व्यास या सर्व बाबी काळजीपूर्वक भरा.

7) यानंतर खाली तुमचं क्षेत्र हंगाम / (हेक्टर आणि आर) / पीके / ही माहिती भरा.

8) यानंतर तुमचा अर्ज ‘Succes ‘ होईल.

10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

11) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

सूचना:-

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

महाडीबीटी पोर्टल: Https://Mahadbtmahait.Gov.In

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

टीप : शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या योजनेचा अर्ज आता केला तर तुम्हाला येत्या 2 महिन्यात तुमची पात्रता असेल तर ,,तुम्हाला 100% अनुदान मिळून जाईल.

मित्रांनो ही सरकारी ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे म्हणून तुम्ही ह्या योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा / शेर करा


Scroll to Top