Tarbandi Yojana 2022 : शेताला तारबंदी कुंपणासाठी शासन देणार 50 टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी असा करावा अर्ज..

Tarbandi Yojana 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना पैकी तारबंदी/ शेताला तारकुंपण योजना ही अशीच एक शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे; ही योजना सरकारने तारबंदी योजना ( Tarbandi Yojana Maharashtra 2022 ) या नावाने सुरू केली आहे, या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

 Apply For Learner Licence
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

योजनेचे उद्दिष्ट्य काय? या योजनेच्या मदतीने शेतकरी गाय, बैल, शेळ्या, डुक्कर, तसेच इतर भटक्या जनावरांसह वन्यप्राण्यांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करू शकेल परिणामी ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे, काय आहे ही योजना, त्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार, यासंबंधीच्या सर्व गोष्टींचे जसे कागदपत्रे, अर्ज कसा करावा, हे आज आपण जाणून घेणार आहोत,

Tarkumpan Yojana Maharashtra : भटक्या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भटक्या जनावरे त्यांच्या शेतातील पिके नष्ट करून पिकांची नासधूस करून शेतकऱ्याचे नुकसान करतात आणि ही भीती सर्वच शेतकरी वर्गामध्ये दिसून येते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या कडेने कुंपण घालण्यासाठी 40 ते 50 हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेमार्फत करणार आहे.

 Apply For Learner Licence
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

तारबंदी योजनेसाठी अनुदान किती? तारबंदी योजनेसाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार असून 50 टक्के अनुदान 50 टक्के खर्च हा स्वतः शेतकर्‍याला करावा लागेल. या योजनेतून मिळणारी रक्कम ही थेट शेतकरी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकरी अर्जदाराला त्याच्या मोबाईल द्वारे ऑनलाइन अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन या योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि लाभ मिळवावा लागेल.

 • तारबंदी योजना महाराष्ट्र योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? त्यासाठी आवश्यक पात्रता काय?
 • ज्या शेतकऱ्याकडे लागवडीसाठी 0.5 एकर जमिन आहे, त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • 400 मीटर ची तारबंद झाल्यानंतरच शेतकऱ्याला अनुदान दिले जाईल.
 • या योजनेचा लाभ देशातील सर्व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
 • अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
 Apply For Learner Licence
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
 • तारबंदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे मतदान कार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • रेशन कार्ड
 • जमिनीची जमाबंदी

अर्ज कोठे करावा? Tarbandi Yojana Maharashtra Online Apply

योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तारबंदी योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर, त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी यांना भेटावे लागेल किंवाच तुमच्या जिल्हा कृषी विभागात संपर्क साधून तुम्ही या योजनेची अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता व तुमच्या कृषी अधिकारी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता; धन्यवाद!


Scroll to Top